अंगणवाडी सेविकांना गूगल रीड अलॉन्ग ऐप विषयी प्रशिक्षण


अंगणवाडी सेविकांना गूगल रीड अलॉन्ग ऐप विषयी प्रशिक्षण

आरमोरी दिनांक;- २३/०२/२०२४ आकांक्षित जील्हा कार्यक्रमा अंतर्गत नीती आयोगाची सहयोगी संस्था पिरामल फाऊंडेशन यांच्या मार्फत अंगणवाडी सेवेकांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळे चा मुख्य उद्देश पुर्व प्राथमिक शिक्षण बालकांना सोप्या आणि नवीन पद्धती व प्रकार , अँनिमिया, स्तनपानाचे फायदे यासह विविध विषयावर कुंभार मोहल्ला आरमोरी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. 
गूगल रीड ॲप्लिकेशन हे एक उपयोगी ॲप्लिकेशन आहे.वाचन कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कॉंप्युटर किंवा एंड्रॉइड डिव्हाइसवर Read Along वापरू शकतात. ॲपमधील वाचन करणारी मैत्रीण दिया ही विद्यार्थ्यांनी केलेले वाचन ऐकण्यासाठी आणि ते मोठ्याने वाचत असताना रीअल-टाइम फीडबॅक व प्रोत्साहन देऊन त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, गुगल ची प्रगत टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच आणि व्हॉइस रेकग्निशन तंत्रज्ञाने वापरते.
आरमोरी कुमार मोहाला अंगणवाडी मध्ये प्रशिक्षण पार पडले. अंगणवाडी सेविकांनी विविध कृतीमध्ये सहभाग घेतला. विविध कृतीच्या माध्यमातून प्रात्यक्षित सादरीकरण केले . त्याच बरोबर गूगल रीड अलॉन्ग ऐप विषयी माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाला पिरामल फाउंडेशनचे प्रोग्राम लीडर अविनाश कंजे , राहुल बारचे यानी मार्गदर्शन केले व आरमोरी (शहरी) केंद्रातील एकूण 3० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments