पुल्लीगुंडम येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


पुल्लीगुंडम येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

  
तलीनकसा क्रीडा मंडळ कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आला

मूलचेरा :तालुक्यातील पुल्लीगुंडम येथे तलीनकसा क्रीडा मंडळ कडून आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.सामन्याच्या उदघाटन पूर्वी मुख्य रस्त्यापासून मैदानापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढुन,महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कारुजी रापंजी तर अध्यक्ष म्हणून पोलीस पाटिल रामजी कांदो तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प.स.सदस्या वनिताताई तिम्मा, बोल्लेपल्ली चे उपसरपंच वैशाली दुर्गे,ग्राप सदस्या साधना कुडयेटी,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,ग्राप गेदा माजी उपसरपंच केशव कुडयेटी, प्रतिष्ठित व्यक्ती आनंदरावजी चांदेकर,आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, मलेझरी आविस शाखा अध्यक्ष आकाश नागोसे,रामदास कोसनकर,बंडुजी चांदेकर,सोन्या गावडे,राजू कुडयेटी, बाबुराव दुर्वा,वनरक्षक मनोज कोवे,घिसा धोंडे,केशरी नरोटे,बंडू झोरे,बागेश्वर चांदेकर,दिनकर चांदेकर,प्रवीण रेषे, जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी व्हॉलीबॉल व कबड्डी मैदानी खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 भव्य ग्रामीण कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम तर व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण सहा पुरस्कार ठेवण्यात आले.

तलीनकसा क्रीडा मंडळ कडून आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सूर्यप्रकाश चांदेकर यांनी मानले.या ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला पुल्लीगुंडम,बोल्लेपल्ली सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी तिलक चांदेकर,सूर्यप्रकाश चांदेकर,अजय कांदो,निलब खोब्रागडे,प्रवीण वाकडे,तेजीराम कतलामी,बापू कांदो,सुरेश टोप्पो,अशोक कांदो,ईश्वर कांदो,निलेश कुडयेटी,उमेश गोटा,सूरज कांदो सह तलीनकसा क्रीडा मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments