जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रंगला सिखे इंडिया उत्सव उत्सवाला फोब्ज मार्शल फाऊंडेशन ची भेट

Gadchirolli varta news portal 
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रंगला सिखे इंडिया उत्सव
उत्सवाला फोब्ज मार्शल फाऊंडेशन ची भेट

धानोरा तालुक्यातील दुर्गापूर केंद्रातील सावंगा बूज. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सिखे संस्थेच्या वतीने विद्यार्थी प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली होती.
या प्रदर्शनीला दुर्गापूर केंद्रातील कामनगड, मंगेवाडा आणि सावंगा बूज. आणि पेंढरी केंद्रातील पेकीन मुडझा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सहभागी झालेले होते. प्रदर्शनी ला सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण गावात गावकरी लोकांच्या उपस्थिती मध्ये फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये गावातील समुदायाने आपल्या पारंपरिक वेशभूषेत आपले सामाजिक वाद्य मांजरी घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये गावातील नागरिकांची तुफान गर्दी दिसून येत होती. मिरवणूक झाल्यानंतर सावंगा बूज. शाळेतील विद्यार्थ्यांनी एक आदिवासी नृत्य सादर केले.

        त्यानंतर प्रदर्शनीला उपस्थित असलेले फोब्ज मार्शल फाऊंडेशन च्या निहारिका मॅडम, बिना जोशी मॅडम, सिखेच्या वर्षा परचुरे मॅडम, दुर्गापूर केंद्राचे केंद्रप्रमुख हसन गेडाम, सावंगा बूज. गावचे माजी सरपंच बाबुराव गेडाम, आरोग्य सेवक बडोले, एनएम निर्मला उईके, अंगनवाडी सेविका निर्मला येरमे, आशा वर्कर प्रेमीला गेडाम, अंगनवाडी मदतनीस गीता नरोटे, सावंगा बूज. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीराम गावडे, गाव भूमिया संतोष जांगी, ग्रामसभा अध्यक्ष माणिक हिचामी, गावपाटील निरु नरोटे, सावंगा बूज. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच कामनगड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश गावडे व सदस्य, मंगेवाडा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच पेकीनमुडझा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक प्रामुख्याने हजर होते. त्याचप्रमाणे सावंगा बूज. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र निकोडे, शिक्षिका अनिता साळवे, कामनगड शाळेचे मुख्याध्यापक हसन गेडाम, शिक्षक गुरुदास कन्नाके, मंगेवाडा शाळेचे मुख्याध्यापक नरेश नागमोती, पेकीन मुडझा शाळेचे मुख्याध्यापक शाहू दुगा हे सर्व हजर होते आणि कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रदर्शनी यशस्वी करण्याकरिता सिखेचे गडचिरोली जिल्हा समन्वयक संदीप पाटील, सिखेचे धानोरा तालुक्यातील मार्गदर्शक धनराज कोहळे, गजानन मारगाये व आरमोरी मार्गदर्शक संजय दुगा यांनी सहकार्य केले.
   सदर प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गोष्टीची पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोष्ट कशी तयार केली, त्यामध्ये कोणकोणते घटक असतात, गोष्ट लिहताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर मात कश्या प्रकारे केली या सर्व बाबी विद्यार्थी बोलून दाखवत होते. विद्यार्थ्यांसोबत गावातील नागरिक तसेच प्रमुख पाहुणे यांनी मनमोकळे पणे संवाद साधून विविध प्रश्न विचारले. विद्यार्थी सुध्या मनमोकळे होऊन उत्तरे देत होती.
  कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र निकोडे तर प्रास्ताविक वर्षा परचुरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कामनगड शाळेचे हसन गेडाम यांनी केले.

0/Post a Comment/Comments