आष्टी पोलीसांनी केली अवैद्य दारू विक्रेतावर धडक कार्यवाही


आष्टी पोलीसांनी केली अवैद्य दारू विक्रेतावर धडक कार्यवाही.

माहे एप्रिल २०२४ मध्ये आगामी काळात देशात सार्वत्रीक लोकसभा निवडणुक जाहिर झाल्या असल्याने सदर निवडनुका शांततामय वातावरनात पार पडाव्या व प्रत्येक नागरीकास आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा या उद्देशाने पोलीस अधिक्षक गडचिरोली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अहेरी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांनी अवैद्य धंदयांवर वेळो वेळी धाडी टाकुन त्यांचे विरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने, दि. २०/०३/२०२४ रोजी पोस्टे आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे व त्यांची टिम पोस्टे परिसरात अवैद्य दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने फिरत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली असता मौजा वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व परितोष प्रफुल मिस्त्री दोन्ही रा. वसंतपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली हे हातभट्टी गुळामोहाची दारू गाळण्या करीता वसंतपुर जंगल परीसरात मोठया प्रमाणात गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला आहे. अशा खात्रेशिर
खबरे वरून मौजा वसंतपूर जंगल परीसरात प्रोव्ही बाबत पाहणी केली असता, वरील आरोपीतांच्या ताब्यात ०६ नग २०० लिटर क्षमतेच्या प्लॉस्टिक ड्रम मध्ये एकुन १२०० लिटर हातभट्टी गुळामोहाचा सडवा किंमत १,२०,०००/- रू चा माल मिळुन आला. तसेच एक होंडा शाईन कंपनिची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रू व ०६ प्लॉस्टिक ड्रम असा एकुन १,६३,०००/- रू चा प्रोव्ही मुद्देमाल अवैद्यरित्या मिळुन आल्याने नमुद आरोपीतां विरूध्द पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरचा गुन्हयाचा तपास पोहवा / २४३९ चंद्रप्रकाश निमसरकार हे उप विभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व पोलीस निरीक्षक विशाल काळे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे

0/Post a Comment/Comments