घुग्घुस शहरातील जावेद सिद्दिकी काँग्रेस मित्रपरिवारातर्फे प्रकाश देवतळे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

पंकज रामटेके विशेष प्रतिनिधी‌ 
घुग्घुस शहरातील जावेद सिद्दिकी काँग्रेस मित्रपरिवारातर्फे प्रकाश देवतळे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा


घुग्घुस : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच शोभाताई ठाकरे तसेच माजी काँग्रेस शहराध्यक्ष जावेद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (PSC) आणि नवी दिशा वृद्धाश्रमात फळे आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले आहे.

याप्रसंगी चंद्रपूर काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके,काँग्रेस नेते अश्पाक शेख, माजी ग्रामीण जिल्हा सचिव काँग्रेस कमिटीचे उत्तम ठाकरे, राकेश किन्नाके, बंडू गायकवाड उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments