तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण संपन्न


तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण संपन्न

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी
तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण संपन्न
कामठी येथील पोरवाल महाविद्यालयात संपन्न झाला.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP2020) हे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात लागू होत आहे त्या अनुषंगाने नागपुर जिल्ह्यातील जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.११ मार्च ते १३ मार्च या तीन दिवसीय प्रशिक्षणाला उद्घाटक म्हणून कामठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनील बलपांडे,नागपुर जिल्ह्याच्या डायटच्या श्रीमती मसारकर मॅडम व पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण, उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्रा व्ही बी वंजारीआदी उपस्थित होते.तीन दिवस संपन्न झालेल्या या प्रशिक्षणात ११० शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणासाठी रिसोर्च पर्सन म्हणून श्रीमती
मसारकर मॅडम,
डॉ नीता वानखेडे,प्रा कमल गंधेवार, प्रा ललित मासुरकर,
श्रीमती लोहकरे मॅडम,मडावी मॅडम, श्री दोनाडकर,देवळीकर मॅडम डॉ रोशनखेडे मॅडम ,अंजुम मॅडम व गोडबोले मॅडम याचे अनमोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना मिळाले. कार्यक्रमांचे संचालन प्रा डॉ निता वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिया मडावी यांनी केले.

0/Post a Comment/Comments