माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची कोलपल्ली येथील 'मासुम धन्वंतरी माता मंदिर' महोत्सवाला विशेष उपस्थिती


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची कोलपल्ली येथील 'मासुम धन्वंतरी माता मंदिर' महोत्सवाला विशेष उपस्थिती.


मंदिर परिसरात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते शौच्छालय बांधकाम भूमीपूजन.


*मूलचेरा:-* तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या स्थानिक कोलपल्ली येथे दरवषी 'मासुम धन्वंतरी माता मंदिर' महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षी सुध्दा भक्ती-भावाने मासुम धन्वंतरी माता मंदिर येथे महापुजा कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत मासुम धन्वंतरी माताची पूजा केली.त्यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंच्या हस्ते केले.तसेच परिसरातील गरीब,विधवा महिलांना वस्त्रदान राजे साहेबांनी केलं आणि मासुम धन्वंतरी माता मंदिर परिसरात आलेल्या भक्त जणांना गैरसोय होऊ नये यासाठी स्वखर्चाने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते शौच्छालय बांधकाम भूमीपूजन करण्यात आले.त्यावेळी महाप्रसाद आयोजन मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी मासुम धन्वंतरी माता मंदिर कमिटीचे अध्यक्ष मारोती पेंदांम,उपाध्यक्ष चंद्रकांत वेलादी,सचिव भाऊजी सिडाम,मंदिरचे संस्थापक दिलीप सिडाम महाराज,पुजारी बंडू सिडाम,सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते,वैष्णव ठाकूर,रोहिदास भुरसे,संतोष सिडाम,उमाजी कंनाके,उमेश आत्राम, महेंद्र मडावी,नामदेव मंडवगडे,दिवाकर आत्राम, निसार साहेब,संजू तलांडे,हेमंत कुळसांगे, बुध्दाजी सिडाम तसेच स्थानिक गावकरी व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments