लखमापूर बोरीत पाण्यासाठी गावभर नुसती धावपळ!

लखमापूर बोरीत पाण्यासाठी गावभर नुसती धावपळ !
वैनगंगा नदी पात्रातून पाणी आणताना ग्रामस्थ


लखमापूर बोरी : शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 50 लिटर शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले असताना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरीवासीयांना मात्र एक हंडा पिण्याच्या पाण्यासाठी मागील आठवड्यापासून धावाधाव करावी लागत आहे.
        गावात पाणी योजनेसाठी करोडो रुपये खर्चूनही लखमापूर बोरीवासीय हे प्रत्येक महिन्यात काही दिवस पिण्याच्या पाण्यापासून तहानलेलेच असतात. मिळणारे पाणी हे काही वस्ती उंच जमीन भागावर असल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी अपुरा मिळत असतो व पिण्यासाठी पाणी आठवड्यातून कधी तीन दिवस तर कधी चार पाच दिवसच मिळत असल्याने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तरी पन ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याचे पाणी कर भरण्याची सक्ती केली जात असते .
       गावात पिण्याच्या पाण्याचे नळ असले तरी नळाला पाणी नसल्याने गावाशेजारी असलेल्या वैनगंगा नदी पात्रात, बाहेरच्या गावात किंवा रस्त्यावरील नळावर जाऊन पाणी भरावे लागत आहे. गावात विहीर असूनही त्यात अशुद्ध पाणी असल्याने त्याचा वापर होत नाही. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आम्हाला नियमित पाणी कधी मिळणार ? असा प्रश्न महिला वर्गाकडून ग्रामपंचायत कार्यालयाला विचारला जात आहे. आजपर्यत च्या सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात सपशेल फेल ठरले आहे. 

[ गावात जल जीवन मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. गडचिरोली अंतर्गत नविन वाढीव पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावात नविन पाईप लाईन जोडणी होत असून संबंधित कंत्राटदाराकडून हे काम करीत असताना जुनी मुख्य व गावातील पाईप लाईन नेहमी फुटत आहे. मागील 9 दिवसाअगोदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नाहरकत परवान्या नुसार जोंधरू नैताम या शेतकर्याच्या खाजगी जाग्यावर एरटेल टॉवर चे बांधकामाकरिता खोदकाम करीत असताना पाण्याच्या टाकीकडे जाणारी मुख्य पाईप लाईन ची तोडफोड झाली व ते अजून दुरुस्त केले नसल्याने गावात पाणी पुरवठा बंद आहे. ]

0/Post a Comment/Comments