चामोर्शी येथे मनरेगा सोशल ऑडिट कार्यक्रमांची जनसुनावणी संपन्न


चामोर्शी येथे मनरेगा सोशल ऑडिट कार्यक्रमांची जनसुनावणी संपन्न

जिल्ह्यातील 12 तालुक्यातील नरेगा कामांचे ‘सोशल ऑडिट’ पूर्ण!


       चामोर्शी तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींमधील मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रकिया महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी चे जिल्हा साधन व्यक्ती जितेंद्र चौधरी व विकास मोहुर्ले यांच्या नेतृत्वात 17 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 10-10 दिवसाच्या चार टप्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) प्रक्रिया ग्रामसाधन व्यक्ती कडून करण्यात आली. 
         ग्राम पंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाचे सोशल ऑडिट करताना लेखापरीक्षण, दस्तऐवज तपासणी, जॉब कार्ड तपासणी, बँक पासबुक तपासणी, सर्व कामांची स्थळभेट - मौका पंचनामा, गृहभेटी, मजूरगट चर्चाभेटी, एमआयएस माहितीची तुलनात्मक तपासणी, सिंचन विहीर, घरकुल, रेन हार्वेस्टिंग,शौचालय, पांदण रस्ते, वृक्ष फळबाग लागवड, शोषखड्डे, रोपवाटिका इ. कामांचा समावेश होता.
              सदर कामांची पाहणी करून जनजागृती करण्यात आली असून प्रकियेदरम्यान आलेल्या मुद्याचे वाचन ग्रामसभेत करून काही मुद्दे त्या ठिकाणी ग्रामसभेने खारीज केले व पुढील मुद्दे तालुका स्तरावर जनसुनावणीसाठी पुढे ठेवण्यात आले.
         चामोर्शी तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींची जनसुनावणी शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी तथा जनसुनावणी पॅनल अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर सपाटे, स्वयंसेवी रुदया संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मा. काशिनाथजी देवगडे, नायब तहसीलदार मा. नार्देलवार, मंडळ कृषी अधिकारी मा. वि. एस. वळवी 
गटविकास अधिकारी पं. स. चामोर्शी सागर पाटील , विस्तार अधिकारी नितीन पेंदोर व अंकित काळबांधे, उमेद संघ तालुका व्यवस्थापक मा. भारती पेशट्टीवार, मजूर प्रतिनिधी कविता बोदलकर सदर जनसुनावणी पॅनलच्या उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात आली.
   तालुका साधन व्यक्ती दिलखुश बोदलकर व निशा सोनुले यांनी 76 ग्रामपंचायतींच्या एकूण मुद्यांचे अतिशय शांतपणे वाचन करून काही मुद्दे संबंधित कर्मचाऱ्याचा खुलासा ऐकूण पॅनल च्या निर्णयाने त्वरित त्याचे निराकरण केले तर काही मुद्दे संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. काही मुद्दे पुढील पडताळणी करीता सा.अं. सोसायटी मुंबई येथे पाठवण्यात आले.
        यावेळी सर्व ग्रामसेवक, रोजगारसेवक, नरेगा योजना संबंधित यंत्रणांचे सर्व अधिकारी पीटीओ, डाटा एन्ट्री ऑपरेटर व विविध यंत्रणाप्रमुखांच्या उपस्थितीत जनसुनावणी अतिशय शांततेत सर्व मुद्यांचे पारदर्शक पद्धतीने सर्व पुरावे मांडण्यात आले. जनसुनावणीसोबत नरेगा योजना व कायदा बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटनेकडून यापुढे सर्व दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्याची ग्वाही देण्यात आली.


अनुपस्थितांवर कार्यवाही होणार काय ?
या जनसुनावनी ला काही ग्रामसेवक व रोजगार सेवक व जिल्हा परिषद यंत्रनेचे कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्या संबंधित कर्मचाऱ्याना करणे दाखवा नोटीस बजावून अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले. जनसुनावणी असल्याची माहिती व सूचना प्रत्येक ग्रामपंचायत व यंत्रनेला दिले असताना जुनसुनावनीच्या दिवशी गैरहजर कर्मचारी त्या दिवशी रजा घेतल्या होत्या की दांड्या मारल्या होत्या ? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.]

0/Post a Comment/Comments