ग्लासफोर्डपेठा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


ग्लासफोर्डपेठा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

  
जय भिम सी,सी, क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा भव्य स्वागत करण्यात आला


*सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे जय भिम सी,सी, क्रिकेट मंडळाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.*

*या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.श्री. मदन मस्के साहेब (प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन बामणी) व मा.श्री. दांडे साहेब (PSI उप पोलीस स्टेशन बामणी ) तर प्रमुख पाहुणे म्हणून मादाराम ग्राम पंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,मादाराम ग्राम पंचायत चे माजी सरपंच इरपा मडावी,माजी ग्राम पंचायत उपसरपंच वेंकटस्वामी कार्सपल्ली, आविस सल्लागार तिरुपती वाईल, आविस सल्लागार विजय रेपालवार,आविस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार गणपतजी वेलादी, वेंकटस्वामी रामटेके, सुधाकर कोंडागुर्ले, रवी रामटेके, महेश दुर्गम, जुलेख शेख, विनोद कावेरी, चंद्रमोगली माडेम, रवी बारसागांडी, राहुल कुमरम, करण मडावी, महेश मडावी, सूर्यकांत कुमरम, नवीन गुरनुले, श्रीकांत मडे, संतोष मंदाळे, विजय टाकरे, रोहित आत्राम, श्रावण मडावी, सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.*

*यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.*

*भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक जय भिम क्रिकेट क्लब मंडळ ग्लासफोर्डपेठा यांच्या कडून असे एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले.*

*जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राणाप्रताप मेडी, यांनी मानले.या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला बामणी,ग्लासफोर्डपेठा,वेंकटापूर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी देवराज अल्लूरी, तिरुपती गग्गुरी, राणाप्रताप मेडी, शेखर अल्लूरी, सदानंदम अल्लूरी, मनोहर तलांडी, प्रवीण सोदारी, राजेन्द्र कावरे, सारय्या गंगानबोईना, राम येदासुला, हरीश येदासुला, राजकुमार जूनगरी, सुधीर कावरे सह जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.*

0/Post a Comment/Comments