फुले महाविद्यालयाचे चपराळ्यात विशेष सेवा शिबिर संपन्न


फुले महाविद्यालयाचे चपराळ्यात विशेष सेवा शिबिर संपन्न

आष्टी: वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे स्वच्छता ही सेवा, व्यसनमुक्ती व मतदार जागृती या संकल्पनेवर आधारित विशेष सेवा शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.राजकुमार मुसने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी पाणपोई सुरू करण्यात आली .या पाणपोईचे उद्घाटन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सन २००६ पासून श्री .हनुमान मंदिर प्रशांत धाम तीर्थक्षेत्र चपराळा येथे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्यावतीने भाविकांच्या सेवेसाठी पाणपोई लावण्यात येते. खासदार अशोक नेते यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .यावेळी माननीय बाबुरावजी कोहळे, पोलीस निरीक्षक विशाल काळे ,श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्ट अध्यक्ष संजय पंदीलवार ,दीपक माडूरवार, मनोहर बामनकर, श्री पेदापल्लीवार ,श्री . चौधरी, महात्मा गांधी तंटामुक्त समिती चपराळाचे अध्यक्ष साईनाथ गुरूनुले तथा इतर मान्यवर उपस्थित होते.८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.डॉ.विजया गेडाम, चंद्रपूर व प्रा.डा .उषा खंडाळे चंद्रपूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ.विजया गेडाम यांनी एकेकाळी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम जरी असला तरी मात्र आज महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत यशाची शिखरे गाठलेली आहेत . आता महिला पुरुषांच्या मागे नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडून किंबहुना दोन पाऊल पुढे आहेत. हा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर या महामानव समाजसुधारकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता मुलींनो -महिलांनो आगेकूच करीत आपल्या अस्तित्वाची नोंद प्रकर्षाने करावी ,असे आवाहनही डॉ. विजया गेडाम यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने व श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा या ट्रस्टच्यावतीने प्रा.डा. विजया गेडाम व प्रा. डॉ .उषा खंडाळे यांचा स्मृतिचिन्ह , शाल, श्रीफळ, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सेवा शिबिरातील विद्यार्थ्यांना गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी मार्गदर्शन केले. प्रा.राजकुमार मुसने यांचा हा सेवा उपक्रम अत्यंत स्तुत्य व वाखणण्यासारखा असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश व तेलंगणातून येणाऱ्या भाविकांना या उपक्रमामुळे निश्चितच लाभ होतोय. वर्धा व वैनगंगा नदीच्या पवित्र संगमावरील परमपूज्य संत कार्तिक स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येने साकारलेल्या या तीर्थक्षेत्रातून स्वयंसेवकांनीसुद्धा ऊर्जा घेत कार्य करावे .सेवेचे व्रत्त अंगीकारत मंदिर व आजूबाजूचा परिसर प्लास्टिक मुक्त करीत मतदारानासुद्धा जागृत करण्यात येत आहे . व्यसनमुक्तीवर सुद्धा काम स्वयंसेवक करीत आहेत. हे निश्चितच वाखाणण्यासारखे असल्याचे मत आमदार डॉ . देवराव होळी यांनी व्यक्त केले. यावेळी श्री. हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्टचे अध्यक्ष संजय पंदीलवार यांनी वर्षभर सुरू असणारे विविध सेवा कार्य व उत्सवाची माहिती देऊन सव्यंसेवकांनी असेच सहकार्य करण्याविषयी आवाहन केले. ट्रस्टचे सर्व पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रकाश कुकुडकर,पवन रामगिरकर, वसंत चौधरी, दिलीप चलाख, प्रतीक राठी उपस्थित होते.

मतदार जाणीव जागृती कार्यक्रमात चामोर्शी येथील तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया सविस्तर विशद करून नव मतदारांना नोंदणी करण्याविषयीचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी श्री .तोडसाम, मंडळ अधिकारी विनोद ढोरे, मंडळ अधिकारी अरुण नागरगोजे, तलाठी नाईक ,तलाठी महिंद्रे श्री यंबडवार उपस्थित होते. यात्रेतील मुख्य मार्गाने मतदार जाणीव जागृती विषयक रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रीतम, रोहिणी, अक्षय ,प्रवीण, मयुरी, गायत्री, समीक्षा कुळमेथे यांनी मतदारांना जागृत करण्याकरिता पथनाट्य सादर केले. रात्रो जि. प. शाळा चपराळाच्या समोरील पटांगणात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत बेटी बचाव बेटी पढाव सारख्या कार्यक्रमातून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. सर्च येथील मुक्तीपथ कार्यकर्ती सपना कुडमिते व स्वयंसेवकांनी व्यसनमुक्तीपर कार्यक्रमातून तंबाखू ,दारू, खर्रा सारख्या व्यसनापासून दूर राहण्याविषयी आवहान करण्यात आले. एकूणच मंदिर व आजूबाजूचा परिसरातील स्वच्छता, पाणपोई भोजन वितरण ,भाविकांसाठी सुविधा, जल व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन ,मतदार जाणीव जागृती आणि व्यसनमुक्ती या अनुषंगाने रासेयो स्वयंसेवकांनी मोलाचे कार्य केले.
तीन दिवसीय विशेष सेवा शिबिरास 
अतिरिक्त पोलीस अधिकारी मुरुंगनाथन, पोलीस निरीक्षक विशाल काळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली श्री. कोवे सर, सामाजिक कार्यकर्ते राकेशजी बेलसरे ,संतोष बारापात्रे, कपिल पाल, गणेश शिंगाडे, भास्कर फरकडे,मंगेश पोरेटे ,आर नायर, उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी स्वयंसेवकांच्या उपक्रमास प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले.महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.राजकुमार मुसणे , प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. गणेश खुणे , प्रा.नासिका गभणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , निलेश नाकाडे सर्व शिक्षकेतर कर्मचारी तथा हिमांशू उराडे, प्रवीण चांदेकर, अंशुल सोमकुवर, अक्षय नागापुरे ,स्नेहल बट्टे, प्रीतम आदे ,रोहिणी, मयुरी ,गायत्री, अनिकेत, राहुल, विश्रांती,तनवी , सपना,कोमल या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments