कढोली येथील हनुमान मंदीरात शिवभक्त संदिप झाडे यांच्या सौजन्याने महाशिवरात्री निमित्त होणार महाप्रसादाचे वितरण


कढोली येथील हनुमान मंदीरात शिवभक्त संदिप झाडे यांच्या सौजन्याने महाशिवरात्री निमित्त होणार महाप्रसादाचे वितरण

चामोर्शी : तालुक्यातील कढोली येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदीर येथे ७ मार्च पासून महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त या हनुमान मंदीरात किर्तन भजन, महाप्रसादासह मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आष्टी सह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कढोली येथे दरवर्षी महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणे यावर्षी ही ७ मार्च पासून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तालुक्यातील अनखोडा येथील शिवभक्त संदिप झाडे यांच्या सौजन्याने दिनांक ९ मार्चला सकाळी ८:३० वाजता पासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे करीता या महाप्रसादाचा जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त संदिप झाडे यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments