यात्राकाळात चामोर्शी पत्रकारांचे 'जीवन 'दानाचे कार्य उल्लेखनीय - नगराध्यक्ष जयश्री वायलालवार

यात्राकाळात चामोर्शी पत्रकारांचे 'जीवन 'दानाचे कार्य उल्लेखनीय -  

नगराध्यक्ष जयश्री वायलालवार 


मारोती बारसागडे 
तालुका प्रतिनिधी चामोर्शी


चामोर्शी :- कोणतेही कार्य करण्याची इच्छा असून चालत नाही तर ते कार्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि हे सर्व करण्याचं कार्य चामोर्शी पत्रकार समिती नित्यनेमाने दरवर्षी करत येत आहे आणि भविष्यातही करत राहील यात शंकाच नाही . महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत भाविकांची तहान भागवून पाण्याच्या रूपात 'जीवन ' दानाचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे उल्लेखनीय व प्रशंसनीय असल्याचे परखड मत चामोर्शी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष तथा कार्यकमाच्या अध्यक्षा जयश्रीताई पंकज वायलालवार यांनी मार्कंडादेव येथे पत्रकार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले . 
याप्रसंगी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम , तर प्रमुख अतिथी तहसीलदार प्रशांत घोरुडे , मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर , गौरी कृषी केंद्राचे संचालक पंकज वायलालवार , नगरपंचायतचे उपाध्यक्ष तथा पत्रकार लोमेश बुरांडे , जेष्ठ पत्रकार बबनराव वडेट्टीवार , रत्नाकर बोमीडवार , महसूल अधिकारी फुलझले , अयाज शेख , चंदू कुनघाडकर , अमित साखरे , नरेंद्र सोमनकर , श्रीमंत सुरपाम, किशोर बुरे , श्रावण वाकोडे ,हस्ते भगत आदी उपस्थित होते .
याप्रसंगी उद्घाटक उत्तम तोडसाम यांनी चामोर्शी पत्रकार समिती द्वारा सुरु केलेली पाणपोई ही भाविकांसाठी व यात्रेकरूंसाठी वरदान असल्याचे मत व्यक्त केले .
 तर तहसिलदार प्रशांत घोरुडे यांनी अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी चामोर्शी पत्रकार समिती पुढे येणे व समाजोपयोगी कार्य करणे ही गौरवाची बाब असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे तर आभार कालिदास बन्सोड यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुका पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले .

0/Post a Comment/Comments