प्रा पंकज बाबुलाल गौरकार गेट परीक्षा उत्तीर्ण


प्रा पंकज बाबुलाल
गौरकार गेट परीक्षा उत्तीर्ण


एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पंकज गौरकार यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली.
गेट परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे . जे विद्यार्थी एखाद्या नामांकित शैक्षणिक संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी करत आहेत किंवा काही PSU सह नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी GATE ही एक प्रतिष्ठित परीक्षा आहे. हे उमेदवारांना त्यांच्या कारकीर्दीत भरभराटीचे अनेक दरवाजे उघडते.
इंजिनिअरिंग करणारे बहुतांश विद्यार्थी ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर GATE परीक्षा (GATE Exam Preparation Tips) देतात. GATE परीक्षा पास केल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीच्या आणि शिक्षणाच्या संधी उपल्बध होऊ शकतात.

गेट ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि राष्ट्रीय समन्वय मंडळ - ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (NCB-GATE) द्वारे संयुक्तपणे आयोजित आणि प्रशासित केलेली परीक्षा आहे.भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर संस्थांमधील पदव्युत्तर अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांची तपासणी करण्यासाठी या परीक्षेचा वापर केला जातो.
प्रा पंकज गौरकार है पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात गणित या विषयाचे अध्यापन करतात.अध्यापन करत असताना मिळालेल्या वेळात त्यांनी अत्यंत मेहनतीने ,चिकाटीने जिद्द व परिश्रम करत गेट ही परीक्षा उत्तीर्ण केली.या पूर्वी देखील त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांच्या या यशाबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण, उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा विश्वनाथ वंजारी यांनी व सर्व शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments