लोड शेडिंग वाढली शेतकर्यांचे नियोजन कोलमडले, रब्बी हंगाम संकटात


लोड शेडिंग वाढली शेतकर्यांचे नियोजन कोलमडले, रब्बी हंगाम संकटात

(संतप्त शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार)

🖋ताहिर शेख🔸 कूरखेडा- ०७/०३/२०२४

          तळेगांव‌ व अंतरगाव परीसरातील लोड शेडिंग अचानक ४ तासावरून १२ तास करण्यात आल्याने शेतकर्यांचे नियोजन चूकत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे त्यामूळे संतप्त शेतकर्यानी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे धडक देत येथील विद्यूत पूरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास दि ११ मार्च रोजी कूरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदन देत केला आहे 
           तालूक्यातील तळेगांव फिडर वर व अंतरगाव सब स्टेशन अंतर्गत येणार्या खेडेगांव,पुराडा‌ व रामगड फिडर वर यापूर्वी दिवसातून फक्त सकाळी २ तास व सांयकाळी २तास लोड शेडिंग करण्यात येत होती या अनूषगांने नियोजन करीत या परीसरातील शेतकर्यानी रब्बी धानाची लागवट केली मात्र कोणतीही पूर्वसूचणा न देता दि.६ मार्च पासून येथील लोड शेडिंग ४ तास वरून १२ तास करण्यात आल्याने शेतकर्यांचे नियोजन कोलमडत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे त्यामूळे हवालदिल झालेल्या शेतकर्यानी आज कांग्रेस पदाधिकार्या सह उपविभागीय अधिकारी कार्यालय व विद्यूत वितरण कंपनीचा उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले व तात्काळ विद्यूत पूरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास दि ११ मार्च रोजी कूरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी तालुका कांग्रेस अध्यक्ष जीवन नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम शेतकरी परसराम हलामी, वासूदेव दरवडे,भुमेश्वर सोनवाने, ग्यानचंद सहारे व मोठ्या संख्येत शेतकरी हजर होते.

0/Post a Comment/Comments