सिरोंचा तालुक्यात विकास कामांचा धडाका, भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

सिरोंचा तालुक्यात विकास कामांचा धडाका,
भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

विकास कामांचे भूमिपूजन करताना भाग्यश्री आत्राम

सिरोंचा:तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या गावांमध्ये विकास कामांचा धडाका सुरू असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्याक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सिरोंचा तालुक्यात बरेच गावे विकासापासून कोसो दूर असून या गावांचा विकासासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोट्यवधी रुपयांची निधी दिली आहे.या निधीचा विकास कामांसाठी सदुपयोग करून अतिदुर्गम गावांचा कायापालट करण्यात येणार आहे.तालुक्यातील नारायणपूर,रंगय्यापल्ली,मेडारम आदी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे केली जाणार आहे.

विशेष म्हणचे मागील अनेक वर्षांपासून दुर्गम भागात पाहिजे त्या प्रमाणे विकास झाले नसल्याने भाग्यश्री ताई आत्राम यांनी अश्या गावांत प्रत्यक्ष भेट देऊन समस्या आणि आवश्यक विकास कामांची यादी केली.नागरिकांच्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार विकास कामे मंजूर करण्यात आले.त्यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता मिळताच भूमिपूजन करण्यात आले.थेट जनतेच्या मागणीनुसार विकास कामे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक रंजित गागापुरपवार, नगरसेवक सतीश राचर्लावार,गणेश बोधनवार,मधुकर इंग्लि,बापू आसपुरी,सत्यम ठाकूर,मदनय्या जिलापल्ली,वेंकटी पोचम,गौरक्का अरका,पोचना कावळे,रघुपती अरका,आनंद नागोसे तसेच विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments