नागरिकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी -- सुधीर फरकाडे


नागरिकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी -- सुधीर फरकाडे

आष्टी - हिंदू संस्कृती मध्ये होळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. होळी खेळतांना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही ही काळजी नागरिकांनी घेऊन पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन हरितसेनेचे वतीने सुधीर फरकाडे यांनी केले आहे. 
होळीसाठी जंगलातील लाकडे तोडून न आणता आजूबाजूच्या परिसरातील कचरा , काडी जमा करुन होळी साजरी करावी. तसेच होळीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात यावा. इको फ्रेंडली होळी उत्सव साजरा करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक रंगांचा वापर करुन होळी साजरी करा.नैसर्गिक रंग सहजपणे विघटित होतात. ज्यामुळे जमिनीवर किंवा जलस्त्रोतावर कोणतेही हानीकारक चिन्ह राहात नाही.ही होळी पर्यावरणास अनुकूल होळी असल्याची खात्री देते.त्यामुळे पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात यावी.प्लास्टिकच्या पिशव्यांपासून व प्लास्टिक च्या पिचकारी पासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments