बेरोजगार युवक पोलीस भरतीचे सराव करताना


बेरोजगार युवक पोलीस भरतीचे सराव करताना

मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी

चामोर्शी शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक युवती पोलीस भरतीसाठी आशावादी झाले आहेत. सध्या युवक युवती मोठ्या प्रमाणात धावण्याचा सराव करत आहे त्यामुळे भल्या पहाटेपासून चामोर्शी मुल मार्गावर चामोर्शी आष्टी मार्गावर चामोर्शी गडचिरोली मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे ग्रामीण भागातील युवकांना विविध शाखांमध्ये उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यामुळे तरुण वर्ग अडचणीत सापडला आहे अनेकांना ओढ आता पोलीस भरती कडे लागलेली आहे . आपल्या आपल्या मुलांना काबाड कष्टाची गरज पडू नये त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी लागावी अशी सर्व पालकांची इच्छा असते पालक मोल मजुरी करून पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देतात. मुलं देखील चांगले शिक्षण घेऊन पदवीधर होऊन आहेत परंतु नोकर भरती होत नसल्यामुळे अनेक सुशिक्षित मुले मुली मोल मजुरी करताना दिसत आहेत सध्या पोलीस भरती करिता ग्रामीण भागातील मुले मुली पहाटे किंवा सायंकाळच्या वेळेस मोकळ्या जागेत किंवा रस्त्याने सराव करत असताना दिसत आहेत. जिम मारणे धावणे गोळा फेक करणे या कसरती करताना दिसत आहेत.
इतर विभागात जागा निघत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यामुळे पोलीस शिपाईची तरी नोकरी मिळावी यासाठी सर्वच युवक कसून सराव करीत असल्याचे दिसून येते तीन ते चार कि.मी जागा धावून आल्यानंतर गोळा फेकचा सराव करीत असतात इतर विभागातील भरती काढून बेरोजगारी मुक्त करावी अशी बेरोजगार युवकांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments