*लाॅयड्स मेटल तथा लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्यातर्फे जनजागृती,चष्मे वितरण कार्यक्रम*


*लाॅयड्स मेटल तथा लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्यातर्फे जनजागृती,चष्मे वितरण कार्यक्रम*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

  लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस तथा लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य,शैक्षणिक, महिला सक्षमीकरण,सामाजिक जनजागृती यासारखे विविध प्रकाराचे उपक्रम राबविण्यात येत आहे,याच माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा व्हावी व नागरिकांना गावातच योग्य उपचार मिळावे,यासाठी सामाजिक दायित्व विभागामार्फत ग्राम पंचायत पांढरकवडा या गावात नेत्र तपासणी शिबीर व ज्या नागरिकांनी नेत्र तपासणी केली अशा ज्या नागरिकांना चष्म्याची आवश्यकता होती. त्यांना चष्मे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
   या कार्यक्रमाचे उदघाटन लॉयड्स मेटल येथील अधिकारी कु.नम्रपाली गोंडाने,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुरज तोतडे, प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल येथील अधिकारी श्री.अनुराग मत्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्या सर्वांना चष्मे वितरण करण्यात आले.  
   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रिया पिंपळकर,सौ.मनीषा बरडे, मंजुषा वडस्कर यांनी प्रयत्न केले.

0/Post a Comment/Comments