सुधीरभाऊ सिर्फ नाम ही काफी है......! अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले वेतन

प्रशांत रामटेके विशेष प्रतिनिधी‌ घुग्घूस 


सुधीरभाऊ सिर्फ नाम ही काफी है......!
अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले वेतन 

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या प्रयत्नांना यश 

घुग्घुस : येथील खाजगी सुरक्षा रक्षकांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर वेतन मिळाले.

मुंगोली ते घुग्घुसपर्यंत रेल्वे रुटाचे व पुलाचे नवीन बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी वेकोलितर्फे झेटवर्क या खाजगी कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले. कामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे कंत्राट एससिएस या सुरक्षा एजन्सीला दिले.

या एजन्सीकडे घुग्घुस परिसरातील १७ ते १८ युवक सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. या सुरक्षा एजन्सीने १७ ते १८ सुरक्षा रक्षकांचे वेतन मागील दोन महिन्यापासून दिले नाही त्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व आपली समस्या सांगितली.

ही समस्या लक्षात घेत विवेक बोढे यांनी तत्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही समस्या सांगितली तसेच सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यासाठी सांगितले.

त्याअनुषंगाने सुरक्षा कंपनीने सुरक्षा रक्षकांना तत्काळ एका महिन्याचे वेतन दिले आणि उर्वरित वेतन लवकरच देण्याचे आश्वासन दिले.

सुरक्षा रक्षकांना वेतन मिळाल्याने त्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी सुधीर बोढे, आकाश गिरसावडे, मंगेश डांगे, प्रकाश वर्मा, देवकुमार केशकर, सतीश वाकूलकर, बालाजी मोरे, दुर्गराज कालवा, विशाल टेकाम, राज नान्हे, प्रल्हाद दाडगे, रोनित कालवा, श्रेयश सोदारी, बादल सोदारी, संदीप निखाडे, आशिष बोढे, अमन सोदारी, सचिन कोणपल्लीवार आदींची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments