आष्टी शहरात यावर्षी होणार मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव




आष्टी शहरात यावर्षी होणार मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव

कार्यक्रमाच्या रुपरेषेकरीता 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आयोजकांनी केले आवाहन

भास्कर फरकडे संपादक गडचिरोली वार्ता न्युज

आष्टी :दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात. यंदा भगवान हनुमानाची जयंती २३ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने
आष्टी शहरातील हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री हनुमान जनमोत्सव साजरा करण्यात येत आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमची रुपरेषा ठरविण्यासाठी गुडीपाडवा दिवशी दि. 09.04.2024 रोज मंगळवार ला रात्रो ठीक 8.30.वा हनुमान मंदिर आष्टी येथे मीटिंग घेण्यात येत आहे. तरी नवतरंग गणेश मंडळ आष्टी, श्री सावित्रीबाई शारदा महिला मंडळ आष्टी, व श्री हनुमान मंदिर समिती आष्टी चे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि शहरातील सर्व भक्त गण उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री हनुमान मंदिर समिती आष्टी अध्यक्ष अक्षय अनील कलाक्षपवार यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments