*घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली*


*घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे घुग्घुस परिसरात असलेल्या शांती नगर येथील पावसामुळे नुकसान झाली घरांची पाहणी करुन यांची सुचना यंग चांदा बिग्रेड संस्थापक तसेच आमदार किशोर जोरगेवार यांना संबधीत अधिका-यांना केल्या आहेत.


मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. परिणामी नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आ. किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर शहरात नुकसान झालेल्या घरांची यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी पाहणी करत आहे. या अंतरत दि.३०एप्रिल मंगळवार रोजी शांती नगर येते नुकसान झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली,नुकसान झालेल्या घरांमध्ये शांति भाई तक्कला, सुमन अंधडे,लता कामळे,ज्योति चीलका, सहभागी होते. नुकसान झालेल्या घरांची पाहुणी करत असताना सौरऊर्जेवर चालणारे बोअरिंग तीन महिना पासून बंद पडल्याची सूचना स्थानिका कडून देण्यात आली. या विषयात नगर परिषद कार्यालयात
तक्रार करण्यात आली.
यावेळी यंग चंदा ब्रिगेडचे पदाधिकारी सौ.उषाताई आगदारी, राजू सुर्यावशी,नवीन मोरे,वनिता निहाल, सुनीता चूने, शारदा पून्नला उपस्थीत होते.

0/Post a Comment/Comments