*बेलोरा येथे वेकोली तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन*.


*बेलोरा येथे वेकोली तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन*.
*निरामय आयुष्यासाठी आरोग्य शिबिरे महत्त्वाचे- उपक्षेत्रिय प्रबंधक संजय मिश्रा.*

घुग्घुस 
 ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा कमी असतात त्यामुळे नकळतपणे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र आरोग्य शिबिरांचे आयोजनामुळे आरोग्याची तपासणी होते व त्या माध्यमातून रोगांचे निदान होऊन उपचार केले जातात.त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य शिबिराच्या आयोजनाला महत्त्व असते असे मत वेकोली निलजई उपक्षेत्राचे महाप्रबंधक संजय मिश्रा यांनी व्यक्त केले.वेकोलिच्या सीएसआर फंडातून बेलोरा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. सदर शिबिराचा लाभ गावातील 129 गावकऱ्यांनी घेतला. यावेळी उपक्षेत्रिय महप्रबंधक संजय मिश्रा, प्रबंधक विनोद पाटील, डॉक्टर पराग पांडे,सरपंच श्रीमती कोडापे, यांची उपस्थिती होती. राजीव रतन हॉस्पिटलच्या तज्ञ पथकाने शिबिरात गावकऱ्यांची तपासणी केली. यात 78 महिला तथा 51 पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराला यशस्वी करण्यासाठी वेकोली कर्मचारी तथा गावकऱ्यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments