*उत्पादन लक्ष गाठण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे: खाण प्रबंधक संदीप वागळे.*


*उत्पादन लक्ष गाठण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे: खाण प्रबंधक संदीप वागळे.*

*बेलोरा -नायगाव खाणीत कामगार दिन उत्साहात साजरा.*
  घुग्घुस -
 खाणितील कोळसा उत्पादनाचे लक्ष गाठणे हे पूर्णपणे कामगारांच्या सहकार्यावर अवलंबून असते. यावर्षी खाणीला देण्यात आलेले कोळसा उत्पादनाचे लक्ष कोणताही अपघात न घडता गाठण्यासाठी कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन खाण प्रबंधक संदीप वागळे यांनी कामगारांना केले. वेकोली वनी क्षेत्राच्या बेलोरा- नायगाव कोळसा खाणीत एक मे हा कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात ते बोलत होते. यावेळी खान प्रबंधक संदीप वागळे, सुरक्षा अधिकारी अनिल बोर्डे, संजय काळमेघ, सुरेशसिंग गौर, राजकुमार, राजेशकुमार राय, वामन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम खाण प्रबंधक संदीप वागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नारायण जांभुळकर यांनी कोल इंडिया गीत सादर केले. यावेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारांना योग्य मार्गदर्शन केले. खान प्रबंधक संदीप वागळे यांनी यावर्षी खाणीसाठी ठरविण्यात आलेले कोळसा उत्पादनाचे लक्ष वेळेत पूर्ण करण्यासाठी कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खाणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नारायण जांभुळकर यांनी तर आभार प्रफुल इखारे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुनील बिपटे, प्रज्ञावंत लोणारे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला खाणीतील पदाधिकारी तथा पुरुष व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments