*लाइट्स मेटल्स उद्योगात भव्य रक्तदान शिबिर संपन्न*


*लाइट्स मेटल्स उद्योगात भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात दि.१० मे २०२४ शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,रक्तदानविषयी जनजागृती व्हावी कामगार,कर्मचारी महत्व कळावे याच हेतुने रक्तदान हेच देशसेवा आहे,असे वरिष्ठ लाइट्स मेटल्स कंपनीचे कर्मचारीने मार्गदर्शनात बोलण्यात आले.

यावेळी शेकडोच्या वर वरीष्ठ,स्थायी,अस्थायी व सुरक्षा अधिकारी कामगार,कर्मचारीने रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यात आले.

कंपनीचे उपाध्यक्ष प्रशांत पूरी साहेब यांनी मार्गदर्शनात सांगितले की,रक्तदान हा जीवनदायी रक्त गोळा करण्याचा एकमेव मार्ग आहे. निरोगी लोकांद्वारे दान केलेले रक्त गरजूंना रक्त देण्यासाठी वापरले जाते. प्रगत शस्त्रक्रियांची वाढती प्रकरणे आणि वाढत्या लोकसंख्येमध्ये वाढणारे आजार अशा विविध कारणांमुळे रक्त संक्रमणाची गरज अनेक पटींनी वाढली आहे. मात्र रक्तदात्यांचा तुटवडा मात्र कायम आहे. रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो आणि नपुंसकत्व येते हा लोकांचा समज पूर्णपणे निराधार आहे. आजकाल वैद्यकीय क्षेत्रात घटक थेरपी विकसित केली जात आहे, त्याअंतर्गत रक्ताचे वेगवेगळे घटक रक्ताच्या युनिटमधून वेगळे करून रुग्णाला त्याच्या गरजेनुसार दिले जाऊ शकतात अनेक रुग्णांद्वारे आहे.

प्रमुख पाहुणे जिल्हा सिव्हिल सर्जन महादेव चिंचोळे व चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी ड्राॅ.सुरज मुंधडा,सोनी मेश्राम, मनोज धोडळे,सुखदेव चांदेकर,मयुरी रामटेके,वंदना पवार,अभिलाश कुकडे,चेतन वैरागडे,दानव भाऊ
 यांचे व्यवस्थापनाने शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.


याप्रसंगी प्रमुख हेड श्री.संजयकुमार, मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम,उत्पादन विभाग उपाध्यक्ष गुणाकार शर्मा,प्रबंधक कोशीक गोस,रमेश राधाराम,तरुण केशवानी,प्रितम आगदारी,महेश तिवारी,भारतीय लाइट्स मेटल कामगार संघचे महामंत्री हिवराज बागडे,परशुराम उगे, सुरक्षा अधिकारी विपीन राइकवार,अक्षय थेटे,संजय शेरकी,सतिश सुतसोनकर,वैद्यकीय अधिकारी नारायण कनाडे व शेकडो कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments