विजेचा झटका लागल्याने पोकलँड ऑपरेटरचा मृत्यू

जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची 
विजेचा झटका लागल्याने पोकलँड ऑपरेटरचा मृत्यू



कोरची : तालुका अंतर्गत असलेल्या जामणारा येथील बंधाऱ्याचे खोदकाम करून कोटगुल मार्गाने कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रक मध्ये पोकलँड घेऊन जाताना पाटणखास गावाजवळ गावात जाणारी 11 kv च्या विजतारेला स्पर्श झाल्यामुळे पोकलँड मध्ये बसून असलेल्या ऑपरेटर ला विजेचा जबर धक्का लागला यामुळे ऑपरेटर चेतन आदेचा मृत्यू झाला.

दिनांक १८ मे रोजी सकाळी सुमारे 11 च्या दरम्यान जामणारा येथून बंधाराचे खोदकाम करून कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रक क्रमांक MH 40 BG 1638 मध्ये निघालेल्या पोकलँडचा छत्तीसगड येथील गावाजवळ जवळ असलेल्या गावात जाणाऱ्या 11 kv च्या तारांना स्पर्श झाल्यामुळे पोकलँड मध्ये असलेला ऑपरेटर चेतन आदे रा. गांधीनगर याला विजेचा धक्का लागल्यामुळे सोबत दुचाकीत असलेल्या सहकारी सोबत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले व नंतर ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. सदर पोकलँड हा कुरखेडा येथील धनु राऊत यांच्या मालकीची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ऑपरेटर चेतन आदे हा घरी एकुलता एक कमावणारा असल्यामुळे चेतन याच्या आई बाबा व बहीण यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले आहे. सदर तपास पोलीस स्टेशन पाटणखास येथील पोलीस अधिकारी करीत आहेत.

0/Post a Comment/Comments