हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट


हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी मांडल्या समस्या 

आष्टी: येथून जवळच असलेल्या हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले यावेळी मंदिराचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले 
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक १७ मे रोजी आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले आणि चौडमपल्ली, चपराळा मार्गावर असलेल्या पुलीयाची पाहणी केली व कुनघाडा, चपराळा रस्त्याच्या कामाची व मंदिरातील समस्या देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले यावेळी तहसीलदार,डोंगरे जे ई आर. एफ. ओ,चौडंपल्ली यांच्यासह साईनाथ गुरुनूले तंटा मुकती अध्यक्ष, कोमल मंडळ,उपसरपंच कोकेरवार, रामचंद्र बामणकर आदी यावेळी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments