*श्रीराम विद्यालयाने राखली निकालाची परंपरा कायम*

*
श्रीराम विद्यालयाने राखली निकालाची परंपरा कायम*
     *-कु श्रुती कुंभदेव चंदनखेडे कोरची तालुक्यात प्रथम*

*कोरची :-* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर विभाग नागपुर तर्फे आयोजीत माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2024 (10 वी) च्या परिक्षेत श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथील श्रुती कुंभदेव चंदनखेडे कोरची तालुक्यात प्रथमया विदयार्थीनीने एकुण 445 (89.00%) गुण प्राप्त करून कोरची तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मीळवीला आहे. सोबतच कु योगिनी बाबूलाल शेंडे 413(82.60%), कु. पियुष सुधाकर दोनाडकर 401(80.20) लक्ष्मी दिलीप पेटकुले 398(79.60), श्रेया इंद्रपाल भैसारे 390(78.00)ने गुणनुकमाने उत्तीर्ण झाले. विदयालयाचा एकुण निकाल 93.90% टक्के असुन प्राविण्य श्रेणीत 08 विदयार्थीनी प्रथम श्रेणीत 34 विदयार्थी व 33 विद्यार्थी दवितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचा या यशा बददल प्राचार्या नंदू गोबडे ,प्रा. प्रकाश बांडे ,केशव झोडे ,सत्यवान मेश्राम ,पुरुषोत्तम बावने ,हेमंत भुसारी ,मेहेन्द्र बाविस्कर ,सुषमा खोब्रागडे व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार व कौतुक केले.

0/Post a Comment/Comments