इल्लूर येथे श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा


इल्लूर येथे श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

पंदिलवार दाम्पत्यांनी दिली सदिच्छा भेट


आष्टी : कुंभार समाजबांधव इल्लूर यांच्यातर्फे रविवार, ५ मे महिन्याच्या रोजी श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सकाळी ह.भ.प. सुरेश नागपूरकर महाराज यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली ६ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांची १०७ वा पुण्यतिथी सोहळा व घटस्थापना, दुपारी १२ वाजता भजनाचा कार्यक्रम व ४ वाजता गोपालकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई पंदिलवार, भाजपचे नेते संजय पंदिलवार, सेवानिवृत्त क्षेत्र सहाय्यक पोसगंटीवार यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी अध्यक्ष राजेंद्र पातर, उपाध्यक्ष मुरलीधर पातर, सचिव अशोक पातर, सहसचिव सुदर्शन खोबरे, कोषाध्यक्ष किशोर पातर, मुख्य सूत्रधार कांतूजी पातर, व गावातील सर्व कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments