चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न


चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

पंदिलवार दाम्पत्याकडून दहा हजार रुपयांची मदत



आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना सोहळा सोमवारी (दि. ०६ ) प. पु.संत कार्तिक स्वामी मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महादेव मुर्तीची पुनर्स्थापना उत्साहात करण्यात आला. त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी महादेव मुर्ती पुनर्स्थापना करीता दहा हजार रुपयांची मदत केली . सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी साडेसात पासून रात्री पर्यंत अभिषेक,हवन,पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद,भजन, असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. चपराळा हे पुर्वीपासुनचे धार्मिक स्थळ म्हणून परराज्यात सुद्धा ओळखला जातो चपराळा विषयी फार पुरातन काळापासून फार मोठी लोकवस्ती असल्याचे बोलले जाते अशी आख्यायिका आहे की बैल पोळ्याच्या दिवशी हरवलेला बैल परत दुसऱ्या पोळ्याच्या दिवशी मालकाला मिळाला असे जुने प्रोढ व्यक्ती सांगतात सध्याच्या लोकवस्तीच्या दोन किमी परिसरात अनेक पुरातन अवशेष सापडतात तसेच जंगल परिसरात बोळ्या, तलाव आजही आहे यावरून ह्या परिसरात फार मोठी लोकवस्ती असल्याचे निष्पन्न होते.
वैनगंगा - वर्धा नदिच्या पवित्र संगमावर प्राणहिता नदिच्या काठावर कार्तिक स्वामी महाराजांचे हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा हे पवित्र स्थळ असले तरी गाव शेजारी अनेक स्थळी देव देवतांचे मुर्ती त्यातीलच एका स्थळाचे महादेव मंदिर म्हणून ती मुर्ती उघड्यावर होती आणि गावातीलच लोकांच्या आर्थिक सहकार्यातून पाच सात वर्षांपूर्वी मंदिर उभे झाले परंतु मंदिरात पुरातन मुर्तीचे स्थापना होऊ शकले नाही परंतु हल्ली कार्तिक स्वामी महादेव मंडळ व गावकरी च्या वतीने मुर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त चपराळा परिसरातील अनेक आबालवृद्ध, माता भगिनी,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments