देशात 'इंडिया' आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव होणार-आपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रकाश जिवानी....


देशात 'इंडिया' आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव होणार-आपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रकाश जिवानी....

देसाईगंज :-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून काल,१० मे रोजी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने काल,शुक्रवारी जामीन मंजूर केला असल्याने गडचिरोली आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जीवानी व आपच्या कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
'ना खाऊंगा ना खाणे दुंगा'असे म्हणविणाऱ्यांकडेच 
'सब कूछ खाणे के बाद तभी तुम्हारे पास आऊंगा' असे हल्ली दिसून येत आहे.सत्ता आहे; तो पर्यंत खलबत्ता आहे; अन्यथा 'एक ना धड भाराभर चिंध्या' असे झाल्याशिवाय राहणार नाही.राजे-महाराजे अनादिकाळापासून हुकूमशाही गाजवीत आले.मात्र त्यांनाही पराभव पत्करून नतमस्तक व्हावे लागले आहे.न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की, देशातील लोकशाही धोक्यात आहे.एका खोट्या प्रकरणांत PMLA सारखे गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ४९ दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते.न्यायालयाचा निर्णय हा एक संकेतआहे की, देशातील लोकशाही धोक्यात आहे.कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.पापाचे घडे एक ना एक दिवस भरणार असल्याने देशात 'इंडिया' आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव नक्कीच होणार आहे; असे जीवानी यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments