नेहमी संकटाच्या वेळी रुग्णांच्या मदतीसाठी धावणारी राजमुद्रा फाऊंडेशन


नेहमी संकटाच्या वेळी रुग्णांच्या मदतीसाठी धावणारी राजमुद्रा फाऊंडेशन

राजमुद्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीयांनी मानले आभार 

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली : तालुक्यातील गेराॅ ( पंदेवाही) येथे दिनांक १५ जून रोजी एका महीलेला त्रास होत असल्याचे दूरध्वनी द्वारे नगरपंचायत चे बांधकाम सभापती राघव सुल्वावार यांना कळवताच अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली मनिष ढाली सचिव राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांनी नगरपंचायतीच्या रुग्णवाहिकेने क्षणाचाही विलंब न करता गेराॅ या गावी गेले असता मंजु तलांडे रा. गेराॅ जि.गडचिरोली हि महिला गंभीर अवस्थेत होती. मात्र लगेच त्या त्रस्त महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेस दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. रुग्णालयात दाखल करेपर्यंत अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली व मनिष ढाली सचिव राजमुद्रा_फाउंडेशन एटापल्ली यांनी त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केल्याने राजमुद्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपली माणुसकी जोपासली असल्याने त्रस्त महिलेच्या कुटुंबीयांनी राजमुद्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

0/Post a Comment/Comments