*नगरसेवक देवदूतासारखे धावले;* *अपघातग्रस्तांना मदतीचा हाथ*


*नगरसेवक देवदूतासारखे धावले;*
*अपघातग्रस्तांना मदतीचा हाथ*

एटापल्ली- समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था एटापल्लीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल कुळमेथे व संस्थेचे सदस्य संपत पैडाकुलवार यांचा संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्थासाठी ते देवदूत ठरले.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता एटापल्ली-आलापल्ली मार्गावर छत्तीसगड राज्यातुन एटापल्ली वरून आलापल्ली जात असताना गुरूपल्ली-एटापल्लीच्या मध्ये दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे सचिन नाईक नामक युवकाने कॉल करून निदर्शनास आणून दिले. यावेळी तात्काळ नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी नगरपंचायतीची रुग्णवाहिका स्वतः चालवित गुरूपल्ली जवळ अपघातग्रस्तांन पर्यंत पोहचले व अपघातग्रस्तांची चौकशी करून मदतीचा हाथ दिला.यात महिला संकयी नरेटी(वय-५०) रा.सावेर जि. कांकेर राज्य छत्तीसगड व तरुण राजकुमार नरेटी(वय-२१) रा.सावेर जि. कांकेर राज्य छत्तीसगड यांना दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी तात्काळ नगरपंचायतीच्या रुग्णवाहिकेने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले.त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहे.

0/Post a Comment/Comments