आदिवासी भागातील नवसंजीवनी योजना अंतर्गत भरारी पथक डॅाक्टर्सवर शासनाकडुन अन्याय

राकेश तेलकुंटलवार बातमीदार 
आदिवासी भागातील नवसंजीवनी योजना अंतर्गत भरारी पथक डॅाक्टर्सवर शासनाकडुन अन्याय

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही प्रशासन लावत आहेत ५ वर्षे ऐवजी १० वर्षाचा क्रायटेरिया.

गडचिरोली: आदिवासी भागातील कार्यरत भरारी पथक मानसेवी डॅाक्टर्स पैकी सलग ५ किवा जास्त वर्ष आरोग्य सेवेत कार्यरत डॅाक्टर्स ना सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकिय अधिकारी गट - ब रिक्त पदावर सरसकट समावेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे बैठकित दि २०/६/२०२३ रोजी घेतलेला आहे. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियान चे आयुक्तांनी ५ वर्षांची अट रद्द करुन १० वर्षांची अट लागु करुन डॅाक्टरांच्या समावेशनाच्या आशेवर पाणी फेरलेले आहे.

या डॅाक्टरांना विशेष बाब म्हणुन एकवेळचे समावेशन केले जात असल्याने १० वर्षाखालील सेवा झालेले डॅाक्टर्स वर अन्याय होत आहे.

आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात जिथे रस्ते नाहीत, दळणवळणाची साधने नाहीत अशा गडचिरोली, अमरावती, पालघर, नाशिक, गोंदीया, चंद्रपुर, धुळे, नंदुरबार, ठाणे, यवतमाळ व ईतर अशा एकुण १६ जिल्ह्यात सन १९९५ पासुन सुरु असलेल्या नवसंजीवनी योजनेंतर्गत भरारी पथकातील मानसेवी वैद्यकिय अधिकारी हे गरोदर माता, स्तनदा माता, ०-५ वयोगटातील बालके यांची आरोग्य तपासणी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहचविणे, कोविड काळात कुटूंबाची पर्वा न करता आरोग्य सेवेत झोकुन देणे ईत्यादी सार्वजनिक आरोग्य सेवेचे मुलभूत व महत्वाचे कार्य अत्यंत अल्प मानधनावर अविरतपणे करित आहेत.
सध्या राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजनेंतर्गत एकुण २७१ डॅाक्टर्स पथके कार्यरत आहेत. यांची सेवी १९९५ पासुनच कंत्राटी पद्धतीची असल्याने तीला विस्कळीत स्वरुप येत आहे. त्यामुळे सदर पथकातील बिएएमएस डॅाक्टर्स ना अनेक वर्षापासुन कायम करण्याची मागणी असुन याबाबत आदिवासी भागातीस ना. आमदार महोदय हे पत्रव्यवहार, निवेदने अशा मार्गाने हा विषय मार्गी लावण्याचे काम करित आहेत. त्याअनुसरुन २०२३ जुन महिण्यात आमदार महोदयांच्या मागणी ला मान देवुन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यास तत्वत: मान्यता दिलेली आहे व त्यानुसार संचालकांनी जिल्हा सत्रावरुन ५ वर्षावरील सेवा झालेल्या डॅाक्टर्स ची माहिती मागविलेली आहे. त्यानुसार काम सुरु असताना अचानक ५ वर्षाऐवजी १० वर्षे अट लावल्याने डॅाक्टर्स व त्यांचे कुटूंबावर अन्याय झाल्याचे चित्र दिसत आहे.


कार्यरत डॅाक्टरांचे मत
आरोग्य विभागाने त्या पत्राला जानेवारी २०२४ मधे उत्तर देत मानसेवी डॅाक्टर्स च्या नियुक्तीची नस्ती, त्यांच्या वयाबाबत शिथीलता, तसेच त्यांचे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याबाबतची कार्यपद्घती याबाबत माहिती मागविली. समायोजन विशेष बाब म्हणुन एकदाच म्हणुन ५ वर्षेवरिल सेवा झालेले एकुण १७१ डॅाक्टर्स चे सेवा समावेशन होणे अपेक्षित होते परंतु अटी मधे बदल झाल्याने डॅाक्टर्स मधे निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार विवीध आमदार महोदयांच्या मागण्यानुसार आमचे ५ वर्षावरिल डॅाक्टर्स चे समायोजन करुन आम्हाला न्याय द्यावा.
सर्व मानसेवी वैद्यकिय अधिकारी
जिल्हा गडचिरोली.

0/Post a Comment/Comments