धरणा आंदोलन करुन तहसीलदारांमार्फ अन्न पुरवठा मंत्र्यांना स्वस्त धान्य दुकानदारांनी पाठविले निवेदन


धरणा आंदोलन करुन तहसीलदारांमार्फ अन्न पुरवठा मंत्र्यांना स्वस्त धान्य दुकानदारांनी पाठविले निवेदन

स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेऊन दुकानदारांचे प्रश्न मार्गी लावा 


राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली : अखिल महाराष्ट राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणेच्या वतीने आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून तात्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी अखिल महाराष्ट राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून, स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी, मागण्या, समस्या तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून, मागील बऱ्याच वर्षापासुन स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या आलेल्या नाही. अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दि. १० जानेवारी २०२४ रोजी राज्यातील संघटनेच्या पदाअधिकाऱ्याची महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली असून, या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये प्रती क्विंटल ५०/- रुपयांची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयाकडून करण्यात आले होते. परंतु आजपर्यत या विषयांवर कोणतेही चर्चा किंवा बैठकही झाली नसून, स्वस्त धान्य दुकानदारांच्या जिवनमरणाच्या समस्या असल्याने तसेच शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही बाब वरील संघटनेच्या लक्षात आले.
करीता अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटना व केरोसीन परवानाधारक महासंघ आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, येत्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधावे म्हणुन राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. आंदोलनाची दिशा पुढील प्रमाणे राहील. राज्यभर प्रदेशाने ठरवुन दिल्या प्रमाणे त्या-त्या दिवशी आंदोलन करण्यात येईल, त्या अनुषंगाने आपण या आंदोलनाची दखल घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घ्यावा व दुकानदारांचे प्रश्न मार्गी लावावे, ही आपणास महासंघाच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले 

स्वस्त धान्य दुकानदाऱ्यांचे समस्या खालील प्रमाणे :-

१. आजच्या महागायी नुसार रेगुलर धान्य वाटप मधील मार्जिनच्या रक्कमेत १००/- प्रती क्विंटल प्रमाणे वाढ करण्या बाबत.

२. रेगुलन वाटपचे कमिशन रक्कम दरमहीण्याला १० तारखेच्या आत दुकानदारांच्या खात्यात जमा करण्या बाबत.

३. इ-पॉस मशिनवरती रास्त भाव दुकानदारास धान्य पोहचवुन सुध्दा मशिनवर्ती पुरवठा विभागाकडुन ८ ते १० दिवस मशिनवर स्टॉक उपलब्ध करण्यात येत नाही. तरी धान्य पोहच झाल्यावर २४ तासांच्या आत मशिन वर धान्य उपलब्ध करुन देण्यात यावा.

४. शासकीय गोडावुन मधुन दुकानदारास शासनाच्या नियमाने गहु व तांदुळ प्रती गौणी मध्ये ५० कि. ५०० ग्रॅम. व प्लॅस्टिक गौणी मध्ये ५० किलो. ३०० ग्रॅम असा सरकारी नियमाप्रमाणे धान्य मिळावा. याबाबत सबंधीत अधिकारी व ठेकेदाराला धान्य वजन करुनच देण्याचे आदेश देण्यात यावा.

५. K.Y.C. करण्याचे काम व इत्तर कामे दुकानदार करत असून त्याचा मोबदला आम्हास मिळाला पाहिजे व प्रतेक दुकानदारांचा K.Y.C. रिपोर्ट ई-पॉस मशिनवर्ती दिसला पाहिजे अशी शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात यावी.

६. रास्त भाव दुकानदार यांनी साडी वाटप, पिशवी वाटप केली असून, त्याचा मोबदला रुपये ६ प्रमाणे मिळावा ठरल्या प्रमाणे तो तात्काळ देण्यात यावा. व राहीलेली साडी व पिशवी ई-पॉस मशिनव्दारे वितरणाची व्यवस्था करण्यात यावी.

७. ई- पॉस मशिनवरती ई K.Y.C. चे काम कमितकमी ३ महीण्याची मुद्दत वाढ देण्यात यावी.

८. ई-पॉस मशिनवरती मेलेले व्यक्ती व लग्न झालेली मुलगी इत्तर नावे कमी जास्त करण्याचे आमच्या मशिनवरती सिस्टीम परवानाधाकांना चालु करावा जेणे करुन, काम सरळ होईल व त्याबाबत आम्ही सबंधित कार्यालयाची मंजुरी घेवुनच करु. करीता माहीतीस तथा योग्य कार्यवाहीस्तव निवेदन सादर हि विनंती.

0/Post a Comment/Comments