कोरची येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला डॉ. नामदेव किरसान यांच्या विजयाचा जल्लोष


*कोरची येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला डॉ. नामदेव किरसान यांच्या विजयाचा जल्लोष*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला असून डॉ. किरसान यांनी सतत दोनदा खासदार राहिलेले भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते यांचा पराभव केला आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता यंदा काँग्रेस पक्षाचे डॉ. किरसान किरसान यांना संधी देण्यात आली होती.
         विकास हवा तर चेहरा नवा हे उद्दिष्ट घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून किरसान यांना निवडून आणण्याकरिता खूप मेहनत घेतली होती आणी मागील दहा वर्षांपासून किरसान हे सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतेच व त्यांनी सतत जनसंपर्क सुद्धा कायम ठेवला याचा फायदा डॉ. नामदेव किरसान यांना झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावले होते.
          निवडणुकीच्या निकालाचे उत्साह गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असून कोरची येथे सुद्धा भव्य आतिषबाजी करून व मिठाई वाटून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष प्रतापसिंग गजभिये,शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष डॉ नरेश देशमुख,काँग्रेसचे जिल्हा महासचिव हकीमुद्दिन शेख, सदरूद्दीन भामणी,रामदास साखरे, नगराध्यक्षा हर्षलता भैसारे,महिला काँग्रेस अध्यक्षा प्रेमिलाताई काटेंगे, रामसुराम काटेंगे,वसीम शेख,उध्दव कोरेटी, माजी सभापती कचरीताई काटेंगे, हेमंताताई शेंडे, नगरसेवक धनराज मडावी, धर्मा नेताम, दिलीप मडावी, कौशल्या केवास, रामनाथ कोरचा, धनिराम हिडामी , केशव लेनगुरे,धम्मदीप राऊत,हिरा उईके,रमाकांत निंबेकर, रवि नंदेश्वर,आसाराम सांडेल सर्जूराम जमकातन, जगन जमकातन,हमीद पठाण आदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments