तुमरगुंडा येथे वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट


तुमरगुंडा येथे वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली: गेल्या तीन चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथील गांडा दोहे वड्डे यांचे एटापल्ली - तुमरगुंडा रोडवर रोडच्या बाजूला वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास घडली आहे. अचानक ढग काळवंडून आल्याने पावसाच्या दृष्टीने झाडाचा आसरा घेण्यासाठी झाडाखाली बैलजोडी थांबली होती अशातच‌ सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. झाडाखाली असलेल्या बैलावर अचानक वीज पडली आणि या बैलजोडीचा जागेवरच मृत्यू झाला सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. अश्यातच बैल जोडी गेल्याने गांडा वड्डे यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिवापाड प्रेम असणारी ही बैलाची जोडी मृत्यमुखी पडल्याने त्यांना शोक अनावर झाला आहे.
घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक २० जून रोजी सकाळी घटनास्थळी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी गहाणे यांना पाचारण करून दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर बैल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे व आता शेतीचे काम असल्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर मदत मिळाल्यास दुसरी बैलजोडी घेऊन शेतीचे काम करता येईल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments