तोडसा नगरीत माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष


तोडसा नगरीत माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली : केंद्रातील एनडीए सरकारचा शपथ ग्रहण सोहळा दि. 9 रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान संपन्न झाला. देशाच्या राष्ट्रपती यांनी पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांना शपथ दिली. त्यांच्या समवेत कॅबिनेट मंत्री सहा राज्यमंत्री पदाची सुद्धा शपथ देण्यात आली. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए सरकारचे प्रमुख झालेत. त्याचा आनंद उत्सव एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत आत्राम तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी एटापल्लीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजेवरच्या गाण्यावर नृत्य करून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला.
 यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

0/Post a Comment/Comments