*राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी ,सर्वसामान्य गरीब व महिलांना न्याय देणारा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी*


*राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी ,सर्वसामान्य गरीब व महिलांना न्याय देणारा*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

*लाडली बहन योजना , शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज माफी , मोफत सिलेंडर, यासारखे अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याने सरकारचे केले अभिनंदन*

*दिनांक २८ जून २०२४ मुंबई*

*राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील मातृशक्तीला, शेतकऱ्यांना ,सर्वसामान्य गरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा खरोखरच सर्वसामान्य गरीब महिला शेतकऱ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.*

*महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पामध्ये २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना लाडली बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये , शेतकऱ्यांना कृषी पंपांची थकीत बिल माफी सर्वसामान्य परिवाराला वर्षाला ३ मोफत सिलेंडर, मुलींना १०० टक्के मोफत शिक्षण, राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, कापूस सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये मदत यासारखे जनतेच्या कल्याणकारी निर्णयाने हा अर्थसंकल्प वास्तविक शेतकरी ,सर्वसामान्य गरीब व महिलांना न्याय देणारा ठरला असल्याचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.*

0/Post a Comment/Comments