चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी


चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी


मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी

चामोर्शी = सायंकाळी 5.30 ते 6.00 वाजता दरम्यान चामोर्शी तालुक्यात वेग-वेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली.
चामोर्शी नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या शंकरपूर हेटी येथे मुले क्रिकेट खेळत असताना अचानक वीज कोसळल्याने तेथील वैभव देवेंद्र चौधरी वय 21 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला,तर अंकित देवेंद्र चौधरी वय 23 हा गंभीर जखमी झाला आहे. गुरूदास मणिराम गेडाम वय 50 वर्ष् रा. कुंनघाडा रे गोवर्धन हा व्यक्ती गावाकडे परत येत असताना अंगावर वीज पडुन त्याचा मृत्यू झाला,जखमीमध्ये . विजेच्या धक्क्याने अंकित देवेंद्र चौधरी, क्रिकेट खेळत असताना वीज पडली यामध्ये जखमी झाला तर भावाचा मृत्यू झाला, जखमीला गडचिरोली येथे हलविण्यात आले, तर गट ग्रा. प. मारोडा येथील ग्रा .प. कार्यालय पटांगणात विज पडून लेखाजी नैताम वय 50 हा जखमी झालं व नीलकंठ भोयर जखमी झाला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जखमीना भरती करण्यात आले आहे .
या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर लोकसंख्येने मोठा असलेल्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून कर्मचारीसुद्धा सहकार्य करीत नसल्याने, मृतांच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ करीत अशा रुग्णालयाची आवश्यकता काय ? सामान्य माणसे जाणार कुठे ? याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यास ग्रामीण जनता आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला .

0/Post a Comment/Comments