एबीस कंपनी बोरी येथे एका कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्याने निधन*




*एबीस कंपनी बोरी येथे एका कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्याने निधन*


*एबीस कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

          कोरची तालुक्यातील बोरी येथे असलेल्या एबीस कंपनीमध्ये कोंबड्यांचे मोठे पोल्ट्रीफार्म असून यामध्ये 300 च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कोंबडी व अंडे उत्पादनाकरिता येथे कोरची तालुक्यातील व छत्तीसगड येथील काही युवकांना रोजनदारीवर नियुक्त करण्यात आले आहे परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दिनांक २७ जूनला संध्याकाळी सुमारे 5 च्या दरम्यान या कंपनीत काम करणारे प्रशांत चोपडे (25) व बुधराम सलामे (33) हे विद्युत फिटिंग चे काम करीत असताना एका कर्मचाऱ्याने विद्युत प्रवाह सुरु केले यामुळे प्रशांत चोपडे याला विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर बुधराम सलामे हा जखमी झाला. मुख्य म्हणजे सदर धोक्याचे काम करीत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत नसून यामुळे या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे.


छत्तीसगड राज्यातील बंजारी येथील रहिवासी प्रशांत चोपडे यांनी 3 वर्षापूर्वी या कंपनी मध्ये रोजंदारीवर काम सुरु केले. हाताला काम नाही म्हणून जे काम सांगितले ते करायचे व कुठलीही तक्रार करायची नाही कारण तक्रार केली तर नोकरीचा प्रश्न.. अशी धारणा मनात ठेऊन या कंपनीत सर्व कर्मचारी आपले काम करीत असतात. प्रशांत चोपडे सुद्धा आज विद्युत जोडणीचे काम करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर धक्का लागला व त्यामुळे प्रशांत याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. काही वर्षांपूर्वी प्रशांत च्या वडिलांचे सुद्धा निधन झाले असून दोन वर्षापूर्वी प्रशांत च्या बहिणीचे सुद्धा निधन झाले होते. प्रशांत व त्याचा भाऊ आपल्या आई सोबत बंजारी येथे राहत होते. प्रशांत चा भाऊ शेतीवर राबायचा परंतु यामुळे आपले उदरनिर्वाह चालणार नाही म्हणून प्रशांत ने एबीस कंपनी मध्ये काम करायला सुरुवात केली.
             विद्युत फिटिंग ची कामे करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना हात मोजे, पायांचे बुट, हेल्मेट अशी एकही सुरक्षेची साधने पुरविली जात नसून यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कुठल्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे विशेष लक्ष ठेवले जाते परंतु एबीस कंपनीचे मालक या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त पैसे कमाविण्याच्या मागे धावत असल्याचे दिसून येत आहे.
        प्रशांत च्या जाण्यामुळे त्यांची आई व भाऊ यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व भविष्यात परत अशी दुर्दैवी घटना या कंपनीत घटता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. 
         या कंपनीत काम करणारे कर्मचारी यांना संध्याकाळी 5:30 पर्यंत काम करावे लागते परंतु या कंपनीत असणारे डॉक्टर यांची 4 वाजताच सुट्टी केली जाते. यामुळे दीड तास कर्मचारी दररोज डॉक्टर विनाच आपला जीव मुठीत घेऊन काम करत असल्याचे दिसून येत आहे

0/Post a Comment/Comments