एटापल्ली: विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शालेय पुस्तक वाटप व मिरवणुकीने स्वागत


एटापल्ली: विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शालेय पुस्तक वाटप व मिरवणुकीने स्वागत

राकेश तेलकुंटलवार वार्ताहर एटापल्ली

एटापल्ली : राज्यात उन्हाळ्याचा शालेय सुट्टी नंतर शाळेस दिनांक १ जूनला सुरुवात झाली असून मोठ्याप्रमाणात पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थी उपस्थित होते. त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन तर काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये आगमनाचे स्वागत करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारानुर शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शालेय पुस्तक वाटप करून स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला दिवस आपले शिक्षकांसमवेत आनंदात घालवला

0/Post a Comment/Comments