तेंदुपत्ता संकलन २०२२ चे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करा


तेंदुपत्ता संकलन २०२२ चे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करा

 सामाजिक कार्यकर्ता प्रज्वल नागूलवार यांच्या नेतृत्वात ग्रामकोष समीतीने दिले निवेदन 

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
 

एटापल्ली : तालुक्यातील मरपल्ली, कृष्णार,वासामुंडी असे एकुण तीन कोष समिती अंतर्गत सन २०२२ मध्ये लिलाव घेण्यात आले असता सदर तेंदुपत्ता लिलावात सर्वांत जास्त दराने घेतलेले कंत्राटदार किशोर नामदेव मसराम (सुमन राईस मिल मेंडाळा) रा.चामोशी यांना प्रत्येकी शेकडा पध्दतीने करारनामा करण्यात आला होता. एक हजार रुपये शेकडा प्रमाणे दहा लाख पुढ्याचा करारनामा करण्यात आला परंतु काही रक्कम कंत्राटदाराकडे बाकी आहे ग्रामकोष समीती अध्यक्षांनी संबंधित कंत्राटदाराला पैसे बाबत विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याकरिता ग्रामकोष समीतीने संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करून उर्वरित रक्कम वसूल करून देण्यात यावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ता प्रज्वल नागूलवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार एटापल्ली यांना देण्यात आले. निवेदन देताना ग्रामकोष समीती अध्यक्ष आशिष साधू हिचामी, किशोर कांदो, विलास मडावी, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments