*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले*

शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब, पूर्व विदर्भ संपर्क नेते, आमदार मा. श्री. भास्कर जाधव साहेब, पूर्व विदर्भात समन्वयक मा. श्री. प्रकाश वाघ साहेब, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. महेश जी केदारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी मा. श्री. रियाज भाई शेख यांच्या सहकार्याने तसेच युवासेना तालुका प्रमुख एटापल्ली श्री अक्षय भाऊ पुंगाटी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णार येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एटापल्ली (टोला) येथील विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित श्री नामदेव हीचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली, अरुणाताई निकोडे महिला तालुका संघटिका एटापल्ली, शालिनीताई नैताम उप तालुका संघटिका, अश्विनीताई कंगाली शहर संघटिका, दलू भाऊ पुसाली शिवसेना उपतालुकाप्रमुख, तेजस भाऊ गुज्जलवार शाखाप्रमुख एटापल्ली, ऋषभ भाऊ दुर्गे शाखाप्रमुख तोडसा, मंगेश दूर्वा उपशाखाप्रमुख तोडसा, महादेव हिरा युवासेना तालुका संघटक, अजय भाऊ पैडाकुलवार, रोहित गोंगले, सुरज गोटा, मनीष गावडे, करण पुंगाटी आदी सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments