प्रामाणिक व निष्ठावंत यानांच काॅंग्रेस पक्षाचे विधानसभेचे तिकीट द्या


प्रामाणिक व निष्ठावंत यानांच काॅंग्रेस पक्षाचे विधानसभेचे तिकीट द्या

काॅग्रेस कार्यकर्त्यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे निवेदनातून मागणी 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षामध्ये नव्याने आले आहेत ज्यांनी कधी, नाही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या आधी कुठलीही निवडणूक लढली नाही तसेच काॅंग्रेस पक्षाचे संघटनेचे काम सुद्धा केले नाही अशा व्यक्तीस विधानसभाचे काॅंग्रेस पक्षाचे तिकीट अजिबात देऊ नये.
त्यांना अगोदर पाच ते सहा वर्षे काॅंग्रेस पक्षाच्या संघटनेत काम करावे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवावी व स्वतःचे कोणतेही स्वार्थ न ठेवता पक्षाच्या चांगल्या व वाईट वेळेत सोबत टिकून राहवे नंतरच अशा उमेदवाराचा विचार करावे.
गडचिरोली विधानसभा हा काॅंग्रेस हा बालेकिल्ला नेहमीच राहिला आहे हे या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिसून आले आहे समोर सुद्धा राहण्याकरिता ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा करीता पक्षासोबत प्रामाणिक व निष्ठावंत आहेत पक्षाच्या चांगल्या वाईट काळात जे पक्षासोबत उभे राहलेल्या व्यक्तीला तिकीट देण्याचे करावे जेणेकरून त्यांना अन्याय होणार नाही.
याकरिता आम्ही जिल्हा परिषद सर्कल व काॅंग्रेस कमिटीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, काॅंग्रेस विधानसभा निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार डॉ नामदेव किरसाण, यांचेकडे निवेदन सादर करणार असल्याचे नानाभाऊ पसफूलवार, शंकर पाटील मारशेट्टीवार, विनोद येलमुले, बंडू चापले, मधुकर पुष्पलवार, रामचंद्र बामणकर, बिजन मंडल, वासुदेव कर्डेवार, साईनाथ गुरनुले, अमोल पंदिलवार, सुरज कुकुडकर, सौ भारती राॅय सिडाम, भडके, प्रेमकुमार गोडबोले, ईश्वर बोलगटकर अशी मागणी आदींनी केली आहे

0/Post a Comment/Comments