*ईईएसएल कंपनीचा करारनामा रद्द करा मनोज अग्रवाल यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी*


*ईईएसएल कंपनीचा करारनामा रद्द करा मनोज अग्रवाल यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी*


*कोरची* : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्थांनी पथदिवे बसवताना फक्त एलईडी दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व नागरिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यासाठी फक्त एलईडी दिवे बसविने त्यांच्या बंधनकारक राहील त्याचप्रमाणे राज्याच्या ऊर्जा धोरणास अनुसरून राज्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेकरिता एलईडी दिव्यांचा वापर करून ऊर्जा संवर्धन करण्यासाठी ईईएसएल या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाशी करारनामा करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यासाठी एलईडी दिवे बसवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेतून एलईडी खरेदी करण्यात येऊ नये असे शासनाने आदेश काढले आहे व ईईएसएल एलइडी चा पुरवठा सुद्धा करत नाही आहेत यामुळे याचा त्रास राज्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या जनतेला होत आहे. यामुळे ईईएसएल कंपनीचा करारनामा रद्द करण्यात यावे अशी मागणी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोज अग्रवाल यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

0/Post a Comment/Comments