एटापल्ली वनविभागाची मोठी कारवाई, जेसीबी जप्त


एटापल्ली दिनांक १०। ७। २४
उत्खनन करतेवेळी जेसीबी जप्त
दिनांक २। ७। २४रोजी देवदा-हालवारा रस्त्याच्या कडेने अवैध उत्खनन करतांना दुपारी ३:००वाजता वनरक्षक व वनपाल गस्तीवर असतांना
निदर्शनास आले व लगेच वनरक्षक कु. नैताम व वनपाल श्री पुंगाटी ह्यांनी मा. खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली ह्यांना अवैध उत्खनन होत असल्याची खबर तातडीने दिली व लगेच मा. वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली श्रीमती खोब्रागडे मॅडम ह्यांनी वनविभागाची चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले व जेसीबी क्रमांक सी. जी. १७के.टी.३६०४आर.के.कंट्रक्शन धानोरा ह्याचा वाहन ताब्यात घेतला व जप्त करून पंचनामा व पी. ओ. आर. करून परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे ठेवण्यात आला आहे.
ह्या धाडसी कार्यवाही मुळे वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे मॅडम यांचे परिसरात कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments