राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचा वतीने विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा...!



राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचा वतीने विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा...!

सिरोंचात तत्काळ मानव विकास मिशनचे बसेस उपलब्ध करा : अन्यथा रस्त्यावर उतरू - सागर मूलकला 


सिरोंचा तालुक्यात मानव विकास मिशन योजनेचे ST बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, तालुक्यात स्वतंत्र बस डेपो नसल्याने तालुक्यातील जनतेला प्रवासासाठी 110 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या अहेरी आगारातील बस सेवेवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही, सध्या आलापल्ली सिरोंचा रस्त्याचे व पुलांचे बांधकाम सुरू आहे, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुलांच्या बाजूचे अप्रोच रस्ता पाण्यात वाहून गेल्याने रस्ता बंद आहे,यामुळे अहेरी डेपोच्या बस गाड्या बंद करण्यात आले आहे.* मानव विकास मिशन योजनेच्या ST बसेस ही बंद करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी गाड्याने पैसे खर्च करून प्रवास करून मुख्यालयात शाळेत येणे खूप मोठी अडचण होत आहे, यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याच्या भीतीने मानसिक तणावात आहेत,करिता तात्काळ पर्यायी व्यवस्था म्हणुन सिरोंचात मानव विकास मिशन अंतर्गत बसेस उपलब्ध करून द्यावे,सिरोंचा येथे तात्पुरते बस डेपोही सुरु करण्यात यावे, विद्यार्थ्यांची व प्रवाशांची अडचण तात्काळ दूर करावे, अशी मागणी विद्यार्थांना घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी कांग्रेस (शप) पक्षाचे वतीने विद्यार्थांना घेऊन बस स्टँड चौक येथून रॅलीने सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा कडून तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी तसेच आगार व्यवस्थापक कार्यालय अहेरी यांच्याकडे निवेदाद्वारे १५ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा देत निवेदन देण्यात आली आहे, त्यावेळी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, सचिव - विनोद नायडू, शहर अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - गणेश संड्रा, आणि ग्रामीण भागातून येणारी विद्यार्थी/ विद्यार्थिनीचा उपस्थित होते,

0/Post a Comment/Comments