मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात प्रथम

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात प्रथम आलेली संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली ची विद्यार्थिनी कु. आस्था राजेश बोम्मावार , हिचे नवोदय विद्यालय घोट येथे निवड झालेली आहे.पुढे IAS बनून देशाची सेवा करण्याचे यीचे स्वप्न आहे. कु. आस्थाच्या यशाबद्दल शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,संस्थापक श्री विजय संस्कार व पूजा संस्कार तसेच आई सौ. राखी व वडील श्री राजेश बोम्मावार यांनी तिचे अभिनंदन केले. निवडीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागील वर्षीही संस्कार स्कूल च्या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली होती हे विशेष.

0/Post a Comment/Comments