*ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सज्ज : विवेक बोढे*


*ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सज्ज : विवेक बोढे*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस : महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेची नुकतीच पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. १ जुलै पासून ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेला प्रती महिना १५०० रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांचे वय २१ ते ६० वर्षापर्यंत, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, जन्म दाखला किंवा डोमासाईल प्रमाणपत्र लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे.

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र नेहमी शासकीय योजना मिळवून देण्यासाठी अग्रेसर असते. हजारो लाभार्थी या केंद्रात येऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घेतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र पुढे सरसवाले आहे. 

१५ सेवादुतांची नियुक्ती करून संगणकाच्या माध्यमातून ही योजना नि:शुल्क पणे राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी व लाभ मिळवून घेण्यासाठी घुग्गुस, राजुरा, कोरपना, गडचांदुर, गोंडपिपरी, जिवती येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments